(Old blog posted on June 28 2009 at http://colorsnshadows.blogspot.in/ )
ॠतू कूस बदलतात. मृगाचे ढग अंगणी येतात .त्यांचं येणं धरणीचं रूप हिरवाईनं बहरण्याचा सांगावा आणतं. काही दिवसांपूर्वीच्या उष्माची जागा गारव्यानं व्यापली जाते . . . आणि मोहक बदलाची ही चाहूल मयूराला मोहरून टाकते . . . हिमायतबाग़ परिसरातील या क्षणांना टिपलंय अभियांत्रिकीचा विद्यार्थी सुमीत सतीश जोशी याने . . .
सकाळ
१८ जून २००८
औरंगाबाद